You are currently viewing थोर समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचा वर्धापनदिन संपन्न

थोर समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचा वर्धापनदिन संपन्न

राळेगणसिद्धी (सौ. वसुधा नाईक)

जागतिक पर्यावरण दिन तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण तसेच सामाजिक कार्य करीत असलेल्या राष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशिय संस्था, भारत संघटनेच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित दोन दिवशीय राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन अधिवेशन २०२२ व राष्ट्रीय पुरस्कार वितरण चे भव्य आयोजन , राळेगणसिद्धी,(ता.पारनेर,जि.अहमदनगर) येथे थोर समाजसेवक पद्मश्री डॉ.अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
दोन दिवशीय राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन अधिवेशनात संपुर्ण देशांत पर्यावरण तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत असलेल्या पर्यावरण सेवक, समाजसेवक यांना राष्ट्रीय पर्यावरण मित्र,राष्ट्रीय समाजरत्न, राष्ट्रीय हिरकणी, राष्ट्रीय आदर्श शिक्षक, राष्ट्रीय अन्नदाता, राष्ट्रीय पक्षीमित्र,राष्ट्रीय पर्यटन भूषण तसेच उत्कृष्ट कवी कवयित्री यांना राष्ट्रीय काव्यरत्न पुरस्कार इत्यादी विविध पुरस्काराने केलेल्या कार्याचा गौरव म्हणून तसेच यापुढेही पर्यावरण साठी समाजासाठी कार्य कराल या हेतूने सन्मानित करण्यात आले.
या भव्य दोन दिवशीय राष्ट्रीय अधिवेशनात संमेलन उद्घाटक थोर समाजसेवक अण्णा हजारे तसेच संमेलन अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष देवा तांबे व सचिव दिपक काळे उपस्थित होते.
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून इंद्रायणी सेवा फौंडेशन चे अध्यक्ष विठ्ठल शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते विश्व वारकरी सेना चे ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, माजी आयुक्त तसेच माजी जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख,माजी सभापती पंचायत समिती खटाव चे संदीप मांडवे,ग्रीन सोशियल फौंडेशन च्या अध्यक्षा सौ.अनुराधाताई देशमुख,सामाजिक कार्यकर्त्या डॉ.प्रियाताई शिंदे,सामाजिक कार्यकर्त्या सौ.अरुणाताई बर्गे तसेच पर्यावरण मित्र बहुउद्देशिय संस्थेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रमेश शेंडे,राज्य संघटक गोकुळ देवरे,सांप्रदाय विभाग अध्यक्षा हभप.सौ.पुनमताई जाचक तसेच संस्थेचे महाराष्ट्र राज्य नियोजन समिती पदाधिकारी, संस्थेचे राजस्थान राज्य अध्यक्ष मुलाराम बाणा,छत्तीसगढ राज्य सचिव महेश कुमार साहू तसेच देशातील संस्थेचे तालुके, जिल्हे, राज्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थोर समाजसेवक आण्णा हजारेंच्या हस्ते वसुधा राष्र्टीय आदर्श शिक्षिका या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा