You are currently viewing गझल

गझल

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी गझलकार जयराम धोंगडे लिखित अप्रतिम गझल रचना*

*गझल*

मी सोडवीत आलो गुंता पदावलीचा..
हाताळतो गझल अन् ठेका लगावलीचा!

लावण्य काय वर्णू शब्दास माळते ती..
डोईवरी जणू मग तो पदर मखमलीचा!

नाही पसंत तिजला वाईट बोलणे अन्..
ना अभद्र चालते ना तो शब्द परवलीचा!

अलवार भावनांचा वर्षाव काळजावर..
मग वाटते गझल मज आधार मावलीचा!

उन्हास त्रासल्यावर कंठात प्राण येतो..
तेंव्हा शिरावरी या, ती घेर सावलीचा

जयराम धोंगडे

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 − one =