You are currently viewing दोडामार्गमध्ये उद्या पाणीटंचाई उपाययोजनांबाबत बैठक

दोडामार्गमध्ये उद्या पाणीटंचाई उपाययोजनांबाबत बैठक

दोडामार्गमध्ये उद्या पाणीटंचाई उपाययोजनांबाबत बैठक

आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली महालक्ष्मी हॉलमध्ये चर्चा; त्यानंतर कुडासे तलाठी कार्यालय इमारतीचे उद्घाटन

दोडामार्ग :

तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईचा आढावा घेऊन पाणीटंचाई आराखडा तयार करणे आणि आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता महालक्ष्मी हॉल, दोडामार्ग येथे आमदार दीपकभाई केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीनंतर सकाळी ११.३० वाजता कुडासे येथील तलाठी कार्यालयाच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांना संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा