You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे उद्या एक दिवशीय काम बंद आंदोलन…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे उद्या एक दिवशीय काम बंद आंदोलन…

केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ निर्णय;

ग्राहकांच्या गैरसोयी बद्दल संघटनेकडून दिलगिरी

मालवण :

केंद्र सरकारच्या कामगार विरोधी कायद्याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी २६ नोव्हेंबरला भारत बंद पुकारण्यात आला आहे. या आंदोलनाला को – ऑप. बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी देखील या भारत बंद मध्ये सहभागी होणार असल्याची माहिती को – ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन सिंधुदुर्गचे कार्याध्यक्ष विष्णू तांडेल आणि जनरल सेक्रेटरी नितीन शेट्ये यांनी दिली आहे.
केंद्र शासनाने कामगार कायदयात अमूलाग्र बदल केले आहेत. त्यामुळे कामगारांच्या हक्कांवर गदा येणार आहे. या नविन कायदयात संपूर्ण अधिकार मालकाला दिलेले आहेत. तसेच केंद्रशासनाच्या या नवीन कायदयामध्ये राज्यामध्ये असलेले कामगार विषयक कायदे निरर्थक होणार आहेत. याविरुध्द संपूर्ण भारतभर सर्व प्रस्थापित कर्मचारी संघटनांनी गुरुवार दि. २६ नोव्हेंबर रोजी काम बंद आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे. त्यामध्ये जिल्हा बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत. हा बंद बँक व्यवस्थापनाच्या विरोधात नसून केंद्र शासनाने केलेल्या कामगार कायदयातील बदलांच्या विरोधात आहे. तरी गुरुवारी ग्राहक, हितचिंतक, सहकारी संस्था या सर्वांच्या होणाऱ्या गैरसोयी बद्दल संघटनेने दिलगिरी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 2 =