अमरावती दि. 11 –
जून महिन्याच्या शेवटी विदर्भातील शाळा सुरू होणार आहेत. त्या दृष्टिकोनातून सुज्ञ व सुजाण पालकांना अध्यापकांना व विद्यार्थ्यांना योग्य ती दूरदृष्टी देण्याच्या दृष्टिकोनातून एका अभिनव व दिशादर्शक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा नेदरलँड फ्रान्स अबुधाबी येथे कार्यरत असलेले जागतिक कीर्तीचे संशोधक व नवीन दृष्टी देणारे डॉ.चंद्रशेखर मुरादे हे घेणार आहेत. या कार्यशाळेचे आयोजन अमरावती परतवाडा रोडवरील वलगाव येथील सिकची रिसॉर्ट मधील वातानुकूलित कृषी भवन येथे करण्यात आलेले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकॅडमी मिशन आयएएस व प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेमध्ये नोंदणी केलेल्या प्रतिनिधींना प्रवेश देण्यात येईल. या कार्यशाळेमध्ये वर्ग पाच ते वर्ग 10 या वर्गातील विद्यार्थी त्यांचे पालक व शिक्षक सहभागी होऊ शकतात. या कार्यशाळेला प्रथम येणाऱ्या 50 प्रतिनिधींना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक पालकांनी अध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी अग्रीम नोंदणीसाठी मिशनचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांच्याशी 9890967003 या क्रमांकावर संपर्क साधावा. ही कार्यशाळा रविवार दिनांक 14 जून रोजी सकाळी 11 ते एक अशी दोन तासाची असणार आहे. ह्या दूरदृष्टी देणाऱ्या कार्यशाळेचा लाभ पालकांनी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन मिशनचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे व प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक श्री सचिन माळकर यांनी एका संयुक्त पत्रकातून केलेली आहे.
