You are currently viewing डॉ. गिरीश लटके यांच्या काव्यसंग्रह प्रकाशनानिमित्त ‘काव्य जल्लोष’ उत्साहात

डॉ. गिरीश लटके यांच्या काव्यसंग्रह प्रकाशनानिमित्त ‘काव्य जल्लोष’ उत्साहात

डॉ. गिरीश लटके यांच्या काव्यसंग्रह प्रकाशनानिमित्त ‘काव्य जल्लोष’ उत्साहात

( प्रतिनिधी आशा रणखांबे )

कल्याण, शाहू शिक्षण संस्था, कल्याण शाखेअंतर्गत मातोश्री वेलबाई देवजी हरिया कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, शाहू अध्यापक महाविद्यालय आणि देवजीभाई हरिया विधी महाविद्यालय, शहाड-कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ कवी डॉ. गिरीश लटके यांच्या “चराग जलाओ यारो” आणि “रुजवावे पसायदान ओठी” या काव्यसंग्रहांच्या प्रकाशनानिमित्त आयोजित ‘काव्य जल्लोष’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात नुकताच संपन्न झाला.
या सोहळ्यात ज्येष्ठ कवी अशोक बागवे आणि जेष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते काव्यसंग्रहांचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास कल्याण शाखेचे अध्यक्ष जयंतीभाई हरिया, अभिनेते सुधाकर वसईकर, पी.एस.आय. अर्जुन डोमाडे, अभिनेते-दिग्दर्शक मंगेश सातपुते, मैत्री पब्लिकेशनच्या प्रकाशिका मोहिनी कारंडे सह
ज्येष्ठ साहित्यिक शिवा इंगोले , कवी रमेश आव्हाड, अभिनेते राम दोंड , प्रफुल केदार , कवयित्री स्वाती बांगर , प्रा. रुपाली लटके, कवी नवनाथ रणखांबे यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी अदविक लक्का यांनी डॉ. गिरीश लटके यांच्या “संघर्षा” वर इंग्रजी कविता सादर केली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राज असरोडकर, विजय भाई पंडीत, अफसर दखनी, दीपक अग्रवाल, प्रकाश तेली, बाबा रामटेक, प्राचार्य डॉ.सूर्यकांत भोसले, प्राचार्य वैशाली पाटील, प्राचार्य कल्पना सोमणाचे, प्राचार्य चिंतामण भोईर, अनघा मोडक, स्वप्ना वाकचौरे, नयना भोर , विनय भिसे, यशवंत वाळंज, जयसिंग नवले, भीमा शिवशरण, अमोल पितंबरे, किरण खिलारे, रवी खिलारे, प्रा. रुपाली लटके यांनी सहकार्य केले
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात अभिनेते-कवी सुधाकर वसईकर यांच्या अध्यक्षतेखाली काव्यमैफिल रंगली. विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विविध कवींच्या कविता सादर करून साहित्यप्रेमाचा अनोखा आविष्कार घडविला. या सत्राचे सूत्रसंचालन कवयित्री प्रा. कल्पना सोमनाचे यांनी केले.
दुसऱ्या सत्रात डॉ. चिंतामण भोईर यांच्या अध्यक्षतेखाली खुले काव्यसंमेलन पार पडले. कल्याण, शहापूर, उल्हासनगर, मुरबाड आणि आंबिवली परिसरातील कवींनी स्वरचित कविता सादर केल्या. सामाजिक प्रश्न, सांस्कृतिक मूल्ये, मानवी संवेदना आणि समकालीन वास्तव यांवर आधारित कवितांनी श्रोत्यांना विचारप्रवृत्त केले. या सत्राचे सूत्रसंचालन प्रा. के. डी. शिंदे यांनी केले. तिसऱ्या सत्रात काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. गिरीश लटके यांच्या साहित्यसेवेचा गौरव करत त्यांच्या कवितांमधील सामाजिक बांधिलकी, मानवी मूल्यांविषयीची आस्था आणि संवेदनशील अभिव्यक्तीचा विशेष उल्लेख केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर चित्ते यांनी केले.
दिवसभर रंगलेल्या या साहित्यिक सोहळ्यात काव्य, विचार आणि सर्जनशील अभिव्यक्तीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. साहित्यिक, शिक्षक, विद्यार्थी आणि रसिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष उंची लाभली. साहित्यप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरलेला हा काव्य आणि पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा