You are currently viewing वालावलमध्ये युवा संघर्ष मित्रमंडळाचा वृक्षारोपण उपक्रम; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

वालावलमध्ये युवा संघर्ष मित्रमंडळाचा वृक्षारोपण उपक्रम; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

वालावलमध्ये युवा संघर्ष मित्रमंडळाचा वृक्षारोपण उपक्रम; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

आंतरराष्ट्रीय मैत्री दिनानिमित्त विविध वृक्षांची लागवड; युवा वर्गाच्या सामाजिक कार्याचे अर्चना बंगे यांच्याकडून कौतुक

कुडाळ : प्रतिनिधी

वालावल गावातील युवा संघर्ष मित्रमंडळाच्या वतीने आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गावाच्या विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनालाही तेवढेच महत्त्व देत युवा वर्गाने राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार पंचायत समिती सदस्या सौ. अर्चना बंगे यांनी काढले.

या उपक्रमांतर्गत वालावल गावातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी सीताफळ, आंबा, कडुलिंब, बेल, बकुळ, अशोक तसेच विविध औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. यावेळी अर्चना बंगे यांनी युवा वर्गाने सामाजिक कार्यात घेतलेला पुढाकार आणि गावाच्या विकासासाठी सातत्याने दाखविलेली बांधिलकी उल्लेखनीय असल्याचे सांगत सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनीही या वृक्षारोपण उपक्रमाला भेट देऊन युवा वर्गाचे कौतुक केले.

यावेळी करुण राऊळ, सागर पाटकर, भाग्यश्री राऊळ, पूजा राऊळ, विशाल राऊळ, हेमंत वालावलकर, अभय मांजरेकर, अक्षय सारंग, योगेश वालावलकर, गौरव पेडणेकर, आपा वालावलकर, बाळा पार्सेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा