क्रीडा प्रबोधिनीत प्रवेशासाठी नोंदणी सुरू
सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्यामार्फत शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे अंतर्गत राज्यात विविध क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत. सन 2026-27 या वर्षासाठी 9 क्रीडा प्रबोधिनीत निवासी व अनिवासी प्रवेश प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील अधिकाधिक राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी क्रीडा प्रबोधनीकरिता होणाऱ्या प्रवेश चाचणीत सहभागी होण्यासाठी 23 एप्रिल 2026 पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत 9 क्रीडा प्रबोधिनीत प्रवेश प्रक्रियेत 50 टक्के सरळप्रवेश पद्धतीने तर 50 टक्के कौशल्य चाचणीद्वारे प्रक्रीयेअंतर्गत खालील निकषानुसार प्रवेश दिले जाणार आहेत.
प्रवेश प्रकीयासाठी नियम अटी व शर्ती पुढीलप्रमाणे
१. क्रीडा प्रबोधिनी ठिकाणे- राज्यात पुणे, कोल्हापूर, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, गडचिरोली अशा ९ ठिकाणी क्रीडा प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली होती. या ठिकाणी क्रीडा प्रबोधिनीमध्ये क्रीडा प्रशिक्षणार्थीची निवड करण्यासाठी प्रवेश प्रक्रीया राबविण्यात येणार आहे.
२. क्रीडा प्रबोधिनी मधिल क्रीडा प्रकार ज्युदो, जिम्नॅस्टीक्स, हॉकी, शुटींग, फुटबॉल, जलतरण, अॅथलेटिक्स, कुस्ती, बॅडमिंटन, आर्चरी, हॅन्डबॉल, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, ट्रायथलॉन, सायकलिंग, बॉक्सींग अशा १६ क्रीडा प्रकारात प्रशिक्षण देण्यात येते.
३. प्रवेश प्रक्रीया सरळ प्रवेश व कौशल्य चाचणी- सरळ प्रवेश प्रक्रिया क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू ज्यांचे वय १९ वर्ष आतील आहे अशा खेळाडूंना संबंधित खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चित केला जातो. खेळनिहाय कौशल्य चाचणी क्रीडा प्रबोधिनीत असलेल्या खेळात राज्यस्तरावर सहभागी खेळाडूंना ज्यांचे वय १९ वर्ष आतील आहे, अशा खेळाडूंना संबंधित खेळाच्या खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करुन गुणानुक्रमे प्रवेश निश्चित केला जातो.
वैद्यकीय चाचणी– उपरोक्त चाचण्यांमध्ये निवड झालेल्या खेळाडूची वैद्यकीय पथकाव्दारे चाचणी घेवून क्रीडा प्रबोधिनीमध्ये शारीरिक दृष्ट्या सुदृढ खेळाडूंची निवड अंतिम करण्यात येते.
खेळाडूंनी नाव नोंदणी दिनांक – २३.०४.२०२६ पर्यंत, कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर या ठिकाणी करावी. सोबत पासपोर्ट साइज फोटो, जन्माचा दाखला, आधार कार्ड व खेळातील कामिगरी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांची झेरॉक्स (सत्यप्रत) असणे आवश्यक आहे.
खेळाडूची वयोमर्यादा व खेळ पुढीलप्रमाणे-
१. सरळ प्रवेश:- खेळ हॅण्डबॉल, जलतरण, सायकलींग, फुटबॉल, ज्युदो जिम्नॅस्टिक्स, बॅडमिंटन (अनिवासी ठाणे करिता)-वयोमर्यादा- दि. ०१.०१.२००७ नंतर जन्मलेले
२. कौशल्य चाचणी
खेळ – हॅण्डबॉल, जलतरण, सायकलींग, फुटबॉल, ज्युदो जिम्नॅस्टिक्स करिता
वयोमर्यादा- दि. ०१.०१.२००७ नंतर जन्मलेले
३. खेलो इंडिया निपुणता केंद्र. पुणे अॅथलेटिक्स, शूटिंग, सायकलींग करिता दि. ०१.०१.२००६ नंतर
जन्मलेले परंतु २० वर्ष वयोमर्यादेपेक्षा जास्त असलेले खेळाडू पात्र नाही.
४. सरळ प्रवेश व कौशल्य चाचणी
अॅथलेटिक्स, हॉकी छत्रपती संभाजीनगर करिता दि. ०१.०१.२००७ नंतर जन्मलेले
सर्वसाधारण सुचना –
१. सदर चाचण्याकरिता येणा-या खेळाडूनी स्वतः निवास व भोजन व्यवस्था वैयक्तिक स्तरावर करावयाची आहे.
२. सदर चाचण्याकरिता येणा-या खेळाडूंनी संबंधित स्पर्धेचे प्राविण्य / सहभाग प्रमाणपत्र, वयाचा पुरावा इ. माहिती चाचणीस्थळी आणणे बंधनकारक आहे.
३. सदर मान्यत्तेत निवड प्रक्रिया राबविताना सरळ प्रवेश प्रक्रियेन्चये जर इच्छुकांची संख्या ५०% पेक्षा जास्त असेल तर अशा प्रकरणी प्रथम त्यांना प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल व उर्वरित जागेवर कौशल्य चाचणीव्दारे प्रवेश देण्यात येईल.
४. विभागस्तरीय चाचण्यामध्ये पात्र ठरण्याऱ्या खेळाडुंना राज्यस्तरीय चाचणीबाबतच्या सुचना वेळोवेळी देण्यात येतील.
५. याकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्याकडे दि.२३/०४/२०२६ पर्यंत नाव नोंदणी करण्यात यावी. https://forms.gle/aqnpWXJKP2wa
