You are currently viewing सावंतवाडीच्या “महेंद्रा अकॅडमी”त स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू – महेंद्र पेडणेकर

सावंतवाडीच्या “महेंद्रा अकॅडमी”त स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू – महेंद्र पेडणेकर

अधिकारी बनण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी सहभाग घ्या, संस्थेकडुन आवाहन

सावंतवाडी

सावंतवाडी  येथील “महेंद्रा अकॅडमी”च्या माध्यमातून सर्व स्पर्धा परिक्षांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यात राज्य सेवा संयुक्त गट ब/क तसेच सर्व प्रकारच्या सरळ सेवा भरती, पोलिस भरती, स्पेशल बॅच, बँकींग विषयक स्पेशल कोर्स बॅचेस् घेण्यात येणार आहे. त्यामुळे दहावी, बारावीनंतर स्पर्धा परिक्षांमध्ये करियर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांनी महेंद्रा अकॅडमीशी संपर्क साधावा, असे आवाहन संचालक महेंद्र पेडणेकर यांनी केले आहे.

सावंतवाडी गांधी चौक येथील वसंत प्लाझा येथे सुरू असलेल्या या प्रशिक्षण केंद्रात आज पर्यंत अनेक विद्यार्थी घडले आहेत. त्यातील काहींनी अधिकारी होण्या पर्यंत मजल मारली आहे. तर काही विद्यार्थी सद्यस्थितीत शिक्षण घेत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुले अधिकारी व्हावीत हे स्वप्न उराशी बाळगून संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सन २०२३ च्या बॅचसाठी आवश्यक असलेली प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संपर्क ९०२२६८६९४४ / ७३५०२१९०९३ साधून आजच आपली जागा राखून ठेवावी, असे आवाहन श्री. पेडणेकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + six =