You are currently viewing ४५ वर्षे उलटलेल्या पदवीधर बेकराना महिना पाच हजार रुपये द्या…

४५ वर्षे उलटलेल्या पदवीधर बेकराना महिना पाच हजार रुपये द्या…

४५ वर्षे उलटलेल्या पदवीधर बेकराना महिना पाच हजार रुपये द्या…

दयानंद मांगले यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी

प्रवास भाड्यात सवलत देण्याचीही केली मागणी..

देवगड

महाराष्ट्र राज्यात लाखो बेकार पदवीधर असून पदवी प्राप्त करून २५ वर्षे झालेल्या व वयाची ४५ वर्षे पूर्ण केलेल्या सर्व बेकार पदवीधरांना मासिक भत्ता रु ५०००/- पाच हजार व प्रवास भाडे सवलत देण्यात यावी अशी मागणी देवगड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार दयानंद यशवंत मांगले यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे नागपूर येथील अधिवेशनात कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेशजी राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत केली आहे.यावेळी देवगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अयोध्या प्रसाद गावकर कोषाध्यक्ष श्रीकृष्ण रानडे ,सदस्य संतोष कुळकर्णी, गणेश आचरेकर, हेमंत कुळकर्णी ,स्वप्निल लोके ,नागेश दुखंडे, विष्णू धावडे, कणकवली पत्रकार संघाचे सदस्य संतोष राऊळ, संतोष पाताडे, उपस्थित होते. या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात अनेक पदवीधारक युवक युवती मोठ्या प्रमाणात बेकार असून कोणत्याही प्रकारचा व्यवसाय अथवा शासकीय अथवा निमशासकीय नोकरी देखील त्यांना आजतागायत मिळालेली नाही. पदवी प्राप्त गेल्यानंतर सुमारे २५ वर्षे कालावधी उलटूनही आजही हजारो पदवीधर युवा युवती बेकार असून छोटे-मोठे मोल मजुरीचे काम अथवा तुटपुंज्या आर्थिक मदतीवर छोटे व्यवसाय करीत आहेत. असे निदर्शनास आले आहे. पदवी प्राप्त केल्यानंतर सुमारे २५ वर्षाचा कालावधी उलटलेल्या तसेच वयाची किमान ४५ वर्षे पूर्ण केलेल्या युवक युवतींना सद्यस्थितीत वाढत्या महागाईच्या काळात आर्थिक उत्पन्नाचे साधन अत्यंत अल्प स्वरूपाचे असल्याने वयाची ४५ वर्षे पूर्ण केलेले व पदवी प्राप्त करून किमान २५ वर्ष पूर्ण झालेल्या युवक युवतींना किमान प्रति महिना रुपये ५०००/-हजार व राज्य परिवहन महामंडळ प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात यावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आलेली आहे. याबाबत आवश्यक ते सर्वेक्षण करण्यात येऊन या मागणीवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी व बेकार युवक युवतींना योग्य तो न्याय देण्यात यावा अशी मागणी ही श्री. मांगले यांनी या पत्राद्वारे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा