You are currently viewing आपल्या कोकणात एक वाक्य प्रचलित आहे…

आपल्या कोकणात एक वाक्य प्रचलित आहे…

https://www.facebook.com/garajaloregarajalo/
👆 या फेसबूक पेजवर लाईव्ह मुलाखत असेल.

लाईव्ह मुलाखत का पहावी?

1) आपल्या कोकणात एक वाक्य प्रचलित आहे, *”ह्यो माका काय शिकयतलो”*. मी मुंबई कस्टम्स, भारत सरकार या विभागात कनिष्ठ अनुवाद अधिकारी पदावर कार्यरत असून मी B.COM, M. COM, M.A (HINDI), PGDHRM, PGDLL & IR, PGDT, LLB अशा एकूण सात पदव्या संपादित केलेले आहेत. त्यामुळे एक मार्गदर्शक म्हणून विद्यार्थी, पालक वर्ग व व्यक्तींना मार्गदर्शन करण्यास मी पात्र समजतो.

2) संपूर्ण भारतात कर्मचारी चयन आयोगाच्या परीक्षेत 323 उमेदवारांच्या निवड यादीत 166 व्या क्रमांकावर माझी निवड झाली, फक्त दोन महाराष्ट्रीयन व्यक्तींची निवड झाली त्यात मी एकटाच सिंधुदुर्गचा भूमिपुत्र आहे, ही यशोगाथा वर्तमानपत्रात आली नसली, कुठेही पोस्टर पाहिले नसले, परिचित व्यक्तींना सदर यशोगाथा इतरांना सांगणे उचित वाटले नसले तरीही तरी ती यशोगाथा मी सदर लाइव मुलाखतीत कोकणातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी व्यक्त करेन.

3) शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी व कोकणातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे विविध पदांवर निवड करण्यासाठी तिमिरातुनी तेजाकडे ही चळवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे. याचे स्वरूप, उद्दिष्ट, कार्य मुलाखतीत स्पष्ट केले जाईल.

4) हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेला आहे परंतु यात कोकणातील विद्यार्थी कमी आहेत. त्यामुळे कोकणातून अधिकारी तसेच कर्मचारी घडवण्यासाठी उपक्रमात समाविष्ट होण्याचे आवाहन मुलाखतीत केले जाईल.

🙏 सत्यवान रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 1 =