You are currently viewing कोविड रूग्णांसाठी देवगड येथे 150 बेड आणखी उपलब्ध करणार; आमदार नितेश राणे यांची घोषणा

कोविड रूग्णांसाठी देवगड येथे 150 बेड आणखी उपलब्ध करणार; आमदार नितेश राणे यांची घोषणा

देवगड

देवगड तालुक्यात कोरोनाची आकडेवारी सध्या २९८ आहे. ती शून्यावर येऊन देवगड तालुका कोरोना मुक्त कसा होईल याकडे शासकीय व आरोग्ययंत्रणेने लक्ष द्यावे. देवगड तालुक्यामध्ये सध्या केवळ वीस रुग्ण क्षमतेचे कोवीड केअर सेंटर आहेत ते 170 रुग्ण क्षमतेचे करणार असल्याची माहितीही आमदार नितेश राणे यांनी दिली. या कोवीड केअर सेंटरसाठी आमदार नितेश राणे यांनी पन्नास बेड्स स्वखर्चाने खाजगीरित्या उपलब्ध करून दिले आहेत.

कोरोना हॉटस्पॉट ठरत असलेल्या देवगड तालुक्याला आज आमदार नितेश राणे यांनी भेट देत देवगड तहसीलदार कार्यालयात प्रांताधिकारी तहसीलदार यांच्या उपस्थितीत तालुक्यातील कोरोना स्थितीबाबत आढावा घेतला. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देवगड तालुक्यात आरोग्य विभागाचे ६५ टक्के पदे रिक्त असल्याची बाब समोर येताच नितेश राणे यांनी. तात्काळ आरोग्य सभापतींना फोन करून यावर तोडगा काढा कोविड कालावधीत जास्तीत जास्त आरोग्यसेवा चांगल्या पद्धतीने देता येईल याकडे लक्ष द्या. संपूर्ण व्यवसाय ठप्प असताना वीज बिल वसुलीचा तगादा वीज ग्राहकांकडे लावू नका अशी सूचना देखील वीज विभागाचे अधिकारी यांना दिल्या. तसेच आमदार नितेश राणे यांनी कोविड सेंटरमध्ये दिल्या जाणाऱ्या आहार बाबत आलेल्या तक्रारी ऐकून घेत संबंधित ठेकेदाराची चांगलीच कानउघडणी केली .

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + 14 =