You are currently viewing वेंगुर्ले तालुक्यातील खानोली येथील सिद्धेश्वर विवीध कार्य.सोसायटीच्या चेअरमनपदी भाजपाचे तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर यांची बिनविरोध निवड

वेंगुर्ले तालुक्यातील खानोली येथील सिद्धेश्वर विवीध कार्य.सोसायटीच्या चेअरमनपदी भाजपाचे तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर यांची बिनविरोध निवड

व्हॉईस चेअरमनपदी भाजपाचे खानोली गावचे उपसरपंच सुभाष खानोलकर यांची बिनविरोध निवड

खानोली येथील सिद्धेश्वर विवीध कार्य.सोसायटीच्या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत गाव विकास पॅनल ने पॅनल प्रमुख महेश प्रभुखानोलकर यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळवले व विरोधकांचा दारुण पराभव केला . १३ पैकी १२ जागा जिंकून विरोधकांना धोबीपछाड केले .
तोच सिलसीला कायम राखत चेअरमनपदाच्या निवडणुकीत बिनविरोध निवड करत आपले वर्चस्व कायम राखले .
निवडणुक अधिकारी कावले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निवडी ह्या प्रत्येकी एकच फार्म भरल्यामुळे बिनविरोध झाल्या .
या निवडीच्या नंतर भाजपा च्या वतीने प्रदेश का का सदस्य शरदजी चव्हाण व जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी चेअरमन प्रशांत खानोलकर व व्हा.चेअरमन सुभाष खानोलकर यांचे पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले . तसेच खानोली गावच्या सरपंचा प्रणाली खानोलकर यांनीही गावाच्या वतीने दोहोंचा सत्कार केला .
यावेळी भाजपा जिल्हा का.का.सदस्य रामकृष्ण उर्फ बाळा सावंत , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ , प्रभारी ज्ञानेश्वर काळजी , पॅनल प्रमुख महेश प्रभुखानोलकर , माजी चेअरमन मधुकर खाडे , माजी चेअरमन प्रसाद प्रभु , सिद्धेश्वर प्रभुखानोलकर , बुथप्रमुख बाळु खानोलकर , सुनील घाग , संजु प्रभु , रत्नाकर खानोलकर , *संचालक* – शामसुंदर मुननकर , विलास सावंत , नाना कोळेकर , निता कोळेकर , भाई खानोलकर , महेश कांबळी , विजय सातार्डेकर , संतोष खानोलकर , अनंत प्रभु , रत्नप्रभा खानोलकर . पोलिस पाटील धोंडु खानोलकर , सुनील सावंत तसेच खानोली गावचे ग्रामस्थ उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 4 =