You are currently viewing माझी शाळा

माझी शाळा

*ज्येष्ठ साहित्यिका समाजसेविका पर्यावरणप्रेमी आदर्श शिक्षिका अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*माझी शाळा* 

 

समुद्राच्या किनाऱ्यावर

माझी शाळा आहे.

गार गार वारा सतत

तिच्यावरुन वाहे.

 

शाळेपाशी खूप खूप

हिरवी हिरवी झाडे.

झाडांखाली पडलेले

फुलांचे सडे.

 

 

मी जेव्हा मुलांना

शिकवत असते धडा.

समुद्रही ऐकण्यासाठी

होतो जणू वेडा.

 

 

शाळेचे संचालक

गुरुजनही थोर.

कुणालाही कशाचाही

नाही इथे घोर.

 

 

शिकायला शिकवायला

वातावरण छान.

म्हूणन इथली मुले

झालेली महान.

 

 

अनुपमा जाधव

प्रतिक्रिया व्यक्त करा