You are currently viewing युवा नेता विशाल परब वाढदिवस अभिष्टचिंतन

युवा नेता विशाल परब वाढदिवस अभिष्टचिंतन

*राजकिय पटलावर उभरणारे युवा नेतृत्व*

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण करणारं उभरतं युवा नेतृत्व म्हणजे विशाल परब होय…!

मा.खासदार डॉ.निलेश राणे आपला छोटा भाऊ म्हणून ज्यांचा उल्लेख करतात आणि नाम.नारायण राणे यांच्या आदर्शांवर ज्यांनी आपली राजकीय वाटचाल सुरू ठेवली ते राणे कुटुंबियांच्या कुटुंबातीलच एक नाव म्हणजे विशाल परब…!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकांनी नाम.नारायण राणे यांचे नेतृत्व मान्य करून आपली राजकीय वाटचाल सुरू केली. काहींनी केवळ राजकीय फायदा घेतला आणि स्वहित जपले परंतु ज्याप्रमाणे नारायण राणे यांनी समाजकार्य आणि राजकारण या दोन्ही बाबी वेगवेगळ्या दृष्टीने पाहिल्या, अंमलात आणल्या त्याचप्रमाणे विशाल परब यांनी देखील आपली वाटचाल सुरू ठेवली आहे.

जिल्ह्यात सर्वप्रथम मोठमोठे कलाकार आणून नारायण राणे यांनी जिल्ह्यातील जनतेला टिव्ही वर पाहत असलेले कलाकार समक्ष पाहण्याची, ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. त्यानंतर दीपक केसरकर यांनी सावंतवाडी महोत्सवाच्या माध्यमातून लोकांना मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा आस्वाद घ्यायला दिला. आज विशाल परब देखील जिल्ह्यातील जनतेसाठी मोठमोठे कलाकार आणून मनोरंजनाची मेजवानी देत आहेत. जुबिन नौटियाल सारखा देश पातळीवरील दिग्गज आज सावंतवाडी शहरात आपला लाईव्ह कार्यक्रम करतो म्हणजे लोकांसाठी हे स्वप्नवत आहे. इंदुरिकर महाराज जे यू ट्यूब, टिव्ही आदी ठिकाणी दिसतात, ते कुडाळ मध्ये येऊन अलोट गर्दीत आपला कार्यक्रम करून लोकांचे मनोरंजनातून प्रबोधन करतात हे केवळ विशाल परब सारख्या युवा नेत्यामुळे शक्य झाले.

 

राजकीय पटलावर उभरणारे युवा नेते, उद्योजक विशाल परब आज केवळ राजकारण हा मानस न ठेवता जनमानसात आपली प्रतिमा निर्माण करत असून मिलाग्रिस शाळेला लाखाची देणगी असो वा इतर शिक्षण संस्था, मंदिरे, गोरगरीब पीडितांना सामाजिक भावनेतून मदत करताना दिसतात हे त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबाकडून झालेले संस्कार आहेत.

वडील प्रभाकर परब यांचा राजकीय वारसा पुढे नेताना विशाल परब यांनी उद्योजक म्हणूनही नाव कमावले आहे. दिल्ली येथे जात भाजपाचे मास्टरमाईंड केंद्रीय मंत्री अमित शाह आदींच्या भेटीगाठी घेत त्यांनी आपले वजन वाढविले असून भविष्यात नक्कीच जिल्ह्याच्या विकासात ते खारीचा वाटा उचलतील आणि जनमानसात, सर्वसामान्य जनतेच्या हृदयात मानाचे स्थान निर्माण करून राजकीय नेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण ठरतील अशी आशा करूया…

 

उज्ज्वल भविष्यासाठी आणि वाढदिवसाची विशाल परब यांना मनापासून शुभेच्छा देऊया…

“संवाद मिडिया कडून विशाल परब यांना वाढदिवसाच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा”…!

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + 5 =