*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*एक गाणं माझ्यासाठी…*
एक गाणं माझ्यासाठी कधी तरी गा ना
प्रीत तुझी माझ्यासाठी मला कळू दे ना..
तुझ्या गाण्यातून माझी झिरपेल प्रीत
ओठांवर राहिल माझ्या नित्य तुझे गीत..
तुझे गाणे माझी प्रीत मनात माझ्या रुजेल
प्रीतिचा रे अंकुर मग त्यातूनच फुलेल..
तुझ्या गाण्याच्या लहरी हरवतील मन
गवसेल माझ्याहाती तुझे प्रीत धन..
गाण्यातुनी पाझरेल बांसरीचा सूर
आणि मग नाचेल रे माझा मनमोर..
मनमोरावर स्वार होऊ जाऊ दूर दूर
कसं सांगू मनी माझ्या लागे हुरहुर..
प्रा.सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
