हेलन केलर यांच्या दिनानिमित्त दिव्यांग बांधवांचा मेळावा व शैक्षणिक साहित्य वाटप मोठ्या उत्साहात संपन्न*
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल तसेच महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग व कुडाळ पंचायत समितीच्या वतीने मंगलवार दिनांक ३० जून २०२६ रोजी सकाळी 10 वाजता हेलन केलर दिनानिमित्त दिव्यांग बांधवांचा मेळावा व दिव्यांग बांधवांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप सोहळा संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये उपसभापती, पंचायत समिती कुडाळ मा.श्री. सिताराम तेली साहेब, गटविकास अधिकारी पंचायत समिती कुडाळ माननीय श्री मनोज भोगटे साहेब, सहाय्यक गटविकास अधिकारी कुडाळ माननीय श्री प्रवीण हिरलेकर साहेब, सल्लागार श्री शरद पाटेकर साहेब,साईकृपा संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सर, कुडाळ तालुकाध्यक्ष गीता परब मॅडम, सुनील कांबळे साहेब वेंगुर्ला तालुका अध्यक्ष,सुधीर चव्हाण सर, कर्मचारी विशाखा कासले मॅडम सौ प्रसन्ना शिर्के मॅडम ललित गावडे सर, विठ्ठल शिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात हेलन केलर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या मेळाव्यामध्ये उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नांवर चर्चा व त्यांना आवश्यक सहकार्य मिळावे,व दिव्यांग बांधवांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला मेळावा उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी साईकृपा संस्था अध्यक्ष श्री अनिल शिंगाडे सर यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले व विविध योजनांचे फायदे सांगितले. तसेच माननीय श्री गटविकास अधिकारी पंचायत समिती कुडाळ मनोज बोगटे साहेब यांनी देखील दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले व जर काही आमची मदत लागली तरी आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत असे सांगितले. त्याचप्रमाणे सुनील कांबळे साहेब यांनी देखील दिव्यांग बांधवांना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. त्यानंत दिव्यांग बांधवांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.तसेच दीपा परब मॅडम यांच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या शैक्षणिक साहित्यासाठी गीता सावंत,प्रशांत मडव, डॉक्टर नवांगूळ डॉक्टर कोलते,दीपा परब, या आदींचे योगदान लाभले यांचे साईकृपा संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.या मेळाव्यामध्ये पन्नास हून जास्त दिव्यांग उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये सर्व दिव्यांग बांधवांना साईकृपा संस्थेच्या वतीने उपहाराची व्यवस्था करण्यात आली.तसेच उपस्थित दिव्यांग बांधवांना साईकृपा संस्थेच्या वतीने भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. या मेळाव्याला लाभलेल्या सर्व दानशुरांचे आभार व्यक्त करण्यात आले.संस्था कर्मचारी शिर्के मॅडम यांनी उपस्थिताचा आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.
