You are currently viewing ओटवणेत विक्रांत सावंतांचा वाढदिवस उत्साहात; सामाजिक उपक्रमांनी वेधले लक्ष
Oplus_16908288

ओटवणेत विक्रांत सावंतांचा वाढदिवस उत्साहात; सामाजिक उपक्रमांनी वेधले लक्ष

हळदी-कुंकू, ऑर्केस्ट्रा आणि “यक्ष चंडिका युद्ध” दशावतार नाट्यप्रयोगाने रंगली वाढदिवसाची रात्र

सावंतवाडी :

मालगाव जिल्हा परिषद सदस्य विक्रांत विकास सावंत यांचा वाढदिवस त्यांच्या मतदारसंघातील सहाही गावांत उत्साहात साजरा करण्यात येत आहे. ओटवणे येथील युवतीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस २७ मे रोजी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला.

या निमित्त महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम, सिंधु कलाकार मंच ऑर्केस्ट्रा तसेच श्री सातेरी महिला दशावतार नाट्य मंडळ, पावशी यांच्या “यक्ष चंडिका युद्ध” या दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. उशिरापर्यंत रंगलेल्या या कार्यक्रमादरम्यान रात्री १२ वाजता विक्रांत सावंत यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी ओटवणे गावचे वतीने सरपंच आत्माराम उर्फ दाजी गावकर यांनी विक्रांत सावंत यांना शुभेच्छा देताना सातेरी रवळनाथाच्या चरणी साकडे घातले. विक्रांत सावंत यांनी उपस्थितांच्या शुभेच्छा स्वीकारून लोकांचे आभार मानले. तसेच येणाऱ्या काळात या भागात अधिकाधिक शासकीय योजना राबवून विकासकामांना प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी ओटवणे भाजप आणि युवतीच्या कार्यकर्त्यांकडून विक्रांत सावंत यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जय भीम युवक कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ जाधववाडी यांच्या वतीनेही त्यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमास ओटवणे सरपंच आत्माराम उर्फ दाजी गावकर, उपसरपंच संतोष कासकर, शिवसेना मालगाव विभाग प्रमुख उमेश गावकर, ग्राम सदस्य प्रशांत बुराण, ग्राम सदस्य महेश चव्हाण, दशरथ शृंगारे, विठ्ठल गावकर, संतोष सावंत, रामदास पारकर, दिनेश गावकर, विश्वनाथ कोटकऱ, गुंडू जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा