You are currently viewing आडाळी एमआयडीसीत अवैध उत्खननावर शिवसेनेचा हल्लाबोल

आडाळी एमआयडीसीत अवैध उत्खननावर शिवसेनेचा हल्लाबोल

आडाळी एमआयडीसीत अवैध उत्खननावर शिवसेनेचा हल्लाबोल

माती चोरी, डोंगरांचे नुकसान; उत्खनन तात्काळ बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

दोडामार्ग :

आडाळी एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध उत्खनन आणि माती चोरीच्या प्रकरणावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी परिसरात प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला असून, मोठ्या प्रमाणात मायनिंगसाठी अवैधरित्या माती उपसा सुरू असल्याचा आरोप केला आहे.
परिसरातील डोंगर आणि जमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी यावेळी केला. या संपूर्ण प्रकरणाची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमोर मांडण्यात येणार असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
तसेच “प्रशासन नेमकं काय करतंय?” असा सवाल उपस्थित करत तहसीलदार दोडामार्ग यांना जाब विचारणार असल्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. अवैध उत्खनन तात्काळ बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख तथा पंचायत समिती उपसभापती गणेशप्रसाद गवस, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य साक्षी तळवडेकर, पंचायत समिती सदस्य स्नेहा गवस, उपतालुका प्रमुख बाबाजी देसाई, युवा सेना तालुका प्रमुख भगवान गवस, विभाग प्रमुख रामदास मेस्त्री (मणेरी), झरेबाबर सरपंच अनिल शेटकर, पिकुळे सरपंच आप्पा गवस, माजी सरपंच विशांत तळवडेकर (मणेरी), ग्रामपंचायत सदस्य गुरुदास सावंत (सासोली), उपसरपंच सुनील गवस (मांगेली) आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा