You are currently viewing सोनुर्लीत दशावतार नाट्यमहोत्सवाला आजपासून प्रारंभ

सोनुर्लीत दशावतार नाट्यमहोत्सवाला आजपासून प्रारंभ

सोनुर्लीत दशावतार नाट्यमहोत्सवाला आजपासून प्रारंभ

तीन दिवस रंगणार नामांकित दशावतार नाट्यमंडळांचे नाट्यप्रयोग

सावंतवाडी,

कुळघर रंगमंच, सोनुर्ली ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दशावतार नाट्यमहोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात नामांकित दशावतार नाट्यमंडळांचे नाट्यप्रयोग रंगणार आहेत.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, २६ मे रोजी रात्री १० वाजता स्वामी माऊली दशावतार नाट्यमंडळ, डोंगरपाल यांचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. त्यानंतर २७ मे रोजी जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ, आरोस यांचा प्रयोग रंगणार असून, २८ मे रोजी कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरुर यांचा नाट्यप्रयोग होणार आहे.

या नाट्यमहोत्सवाला परिसरातील दशावतार रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा