*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सुशीला हेमचंद्र पिंपरीकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*धरा रडते आहे*
भेगाळली धरा रडे
*झाले काय माते तुला*
अश्रू झालेत कोरडे
*वाटे अस्वस्थ हो मला* |१|
किती सोसाव्या वेदना
*गर्भ नित्य खणताती*
गेले जल खाली खोल
*घरे नभा भिडताती* |२|
काच कचरा पोटात
*साठे ओठात प्लास्टिक*
सोनसाठे खनिजात
*प्रेम करावे आत्मिक* |३|
माय तुम्हा वात्सल्याची
*दु:ख देते प्रदूषण*
लावा झाडे संवर्धना
*जलाविना वणवण* |४|
पशुपक्षी राने वने
*सारी माझीच लेकरे*
जगायचे का सुखाने
*हाती तुझ्या माणसा रे* |५|
सुशीला हेमचंद्र पिंपरीकर, नाशिक
