You are currently viewing जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सिंधुदुर्गव्दारे सामाजिक समता सप्ताह साजरा

जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सिंधुदुर्गव्दारे सामाजिक समता सप्ताह साजरा

सिंधुदुर्गनगरी

महात्मा जोतिबा फुले  व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ‍निमित्त सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात आला, यानिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी विभागाने मार्गदर्शन शिबीर आयोजीत करण्यात आले होते. विविध कार्यक्रम व जात प्रमाणपत्र पडताळणी बाबत मार्गदर्शन शिबीर ओजीत करण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य प्रमोंद जाधव यांनी दिली.

            सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडुन अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे , उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आले. दरवर्षी विद्यार्थ्यांनी 12 वी मध्ये शिकत असताना 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक असते.

             शासन आपल्या दारी च्या धर्तीवर सामाजिक समता सप्ताह या विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष मोहिमे अंतर्गत प्रत्यक्ष काही महाविद्यालयात जाऊन शिबीराचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये कणकवली कॉजेल कणकवली, दोडामार्ग इंग्लीश स्कुल कनिष्ठ महाविद्यालय, राणी पार्वती देवी हायस्कुल ॲण्ड ज्यु. कॉलेज सावंतवाडी ,बाळासाहेब खर्डेकर कॉलेज वेंगुर्ला, शासकीय तंत्रनिकेतन, मालवण, येथे शिबीर आयोजीत करुन जात प्रमाणपत्र पडताळणी बाबत मार्गदर्शन व जात वैधता प्रमाणपत्रांचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आले. तसेच प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकत्तेर कर्मचारी यांनी  ही जात प्रमाणपत्र पडताळणी बाबत आनलाईन वेबीनार व्दारे मार्गदर्शन करण्यात आले. जेष्ठ नागरिकाचा मेळावा  आयोजीत करण्यात आले. भारतरन्त डॉ. बाबासाहेब यांचा  131 व्या जयंती उत्सव सामाजिक न्याय भवन येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून जात प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन व विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वितरीत करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर विचार प्रकट करण्यात आले. बाबासाहेबांचे कार्य किती महान आहे. या बाबत उपस्थितानी आपले विचार मांडले.त्याच बरोबर महिला मेळावा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.

            या सर्व कार्यक्रमामध्ये जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे  उपायुक्त तथा सदस्य प्रमोद जाधव यांनी मागदर्शन व आपले विचार कथन केले.  हा सामाजिक समता सप्ताह यशस्वी करण्यासाठी डॉ. भरत बास्टेवाड अध्यक्ष, उपायुक्त तथा सदस्य प्रमोद जाधव संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव दीपक घाटे, कार्यलयातील सर्व कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले व सदर समता सप्ताह यशस्वी साजरा केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा