You are currently viewing बांदा येथील व्ही. एन.नाबर शाळेचे रेखाकला स्पर्धेत यश

बांदा येथील व्ही. एन.नाबर शाळेचे रेखाकला स्पर्धेत यश

सावंतवाडी:-

व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूलचा कला संचलनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला परीक्षा (इंटरमिजीएट) सन २०२३-२४ चा निकाल प्रतिवर्षीप्रमाणे १००% लागला आहे. या परीक्षेस २६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील १३ विद्यार्थी B श्रेणीत तर १३ विद्यार्थी C श्रेणीत उत्तीर्ण झाले. तसेच शासकीय रेखाकला परीक्षा (एलिमेंटरी) सन २०२३-२०२४ चा या शाळेचा निकाल प्रतिवर्षीप्रमाणे १०० % लागला आहे. या परीक्षेस १६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील ०७ विद्यार्थी B श्रेणीत तर ०९ विद्यार्थी C श्रेणीत उत्तीर्ण झाले. शाळेचे कला शिक्षक हर्षद खडपकर यांचे या मुलांना मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका सौ.मानली देसाई यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा