You are currently viewing तरंदळे ग्रामपंचायत सरपंच सुशील कदम यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत शिपाई शिवराम गावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

तरंदळे ग्रामपंचायत सरपंच सुशील कदम यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत शिपाई शिवराम गावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

तरंदळे ग्रामपंचायत सरपंच सुशील कदम यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत शिपाई शिवराम गावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

कणकवली

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत मेरी मिट्टी मेरा देश अभियान अंतर्गत आज सोमवार दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 7.45 वाजता सरपंच श्री. सुशिल कदम यांच्या संकल्पनेतून तरंदळे ग्रामपंचायत चे शिपाई शिवराम (शामु) गावकर यांनी गावा साठी तळमळीने 35 वर्ष सेवा दिल्या बद्दल त्यांच्या हस्ते सकाळी 7.45 वाजता ध्वजारोहण करण्यात आले.
सकाळी 8 वाजता भारत देश 2047 मध्ये विकसित होवून देश महासत्ता बनण्यासाठी पंचप्रण शप्पत घेण्यात आली.
सकाळी 8.30 वाजता आपल्या मातृ भूमी साठी ज्या सैनिकांनी बलिदान दिले त्याग केला अशा शुर वीरांच्या स्मारकाचे शिला फलकाचे उदघाटन सरपंच श्री. सुशिल कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
सकाळी 9 वाजता तरंदळे गावातील माजी सैनिक सन्माननीय श्री . सोनू सावंत व माजी महाराष्ट्र पोलिस सन्माननीय श्री .सुनिल सावंत यांचा शाल, श्रीफळ,गुलाब पुष्प देवून सत्कार सरपंच श्री. सुशिल कदम व उपसरपंच सौ.शुभावली सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.दोघानाही ह्या वेळी आपले मनोगत व्यक्त केले.कसा आपण खडतर प्रवास केला.आणि नवीन पिढीने भारत देशासाठी योगदान देण्यासाठी पुढे येण्यासाठी आव्हान केलं.
10 वाजता ग्रामपंचायत कार्यालय परिसर मध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी,शालेय परिसरात 75 झाडांचं वृक्षारोपण करण्यात आला.
ह्यावेळी कार्यक्रमाच्या वेळी सरपंच श्री. सुशिल कदम,उपसरपंच सौ.शुभावली सावंत,(सदस्य.तेजस सावंत,दीपक घाडी गावकर,सूनिलदत्त जाधव,नेहा घाडी गावकर,वैशाली घाडी गावकर,संजना राणे),ग्रामसेवक सौ.रेश्मा पालकर,माजी सरपंच श्री.सुधीर सावंत,सामाजिक कार्यकर्ते श्री.मधुसूदन सावंत,पत्रकार श्री.शरद सावंत,माजी सैनिक श्री . सोनू सावंत,माजी पोलीस श्री. सुनिल सावंत,सामाजिक कार्यकर्ते श्री देवा रावले,मुख्याध्यापक .सौ. कुलकर्णी मॅडम,पोकळे सर,डोईफोडे सर, तळदेवकर सर,अंगणवाडी सेविका,आशा ताई,बचत गट प्रतिनिधी, सिआरपी ताई,गावातील प्रतिष्ठित नागरिक,शाळेतील विद्यार्थी ग्रामपंचायत कर्मचारी अभय सावंत,शिवराम गावकर,वनिता कदम उपस्थित होते.
ग्रामसेवक रेश्मा पालकर यांनी सर्वजण उपस्थित राहिल्या बद्दल सर्वांचं शब्द सुमनाने स्वागत केले व आभार ही मानले.
गावातील माजी सैनिक सन्माननीय श्री.प्रभाकर सावंत यांचं सत्कार त्यांच्या राहत्या घरी जावून सरपंच श्री. सुशिल कदम,माजी सरपंच श्री सुधीर सावंत,सामाजिक कार्यकर्ते श्री देवा रावले,किरण सामंत,आणि अभय सावंत यांनी शाल,श्रीफळ,गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − thirteen =