You are currently viewing मनाचा कॅनव्हास

मनाचा कॅनव्हास

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री मानसी जामसंडेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मनाचा कॅनव्हास*

 

मानवी मन चंचल

अथांग अमर्याद

कल्पनाशक्तीने रंगवत

आयुष्याचा चलचित्रपट…..

असतो जगत मनु

जीवनात धडपडत……

 

आहे मनाचा कॅनव्हास

चित्रकाराच्या कोऱ्या

कॅनव्हासागत धवल शुभ्र ,

स्वतःचे विचार तरंग

आठवांच्या साठवणी

भल्याबुऱ्या अनुभूती

अनुभवातील शहाणपण…

सारं काही रेखाटत

मनाच्या कॅनव्हासवर

भरत असतो रंग मनु… ,

नित्य वेगवेगळ्या

भाव भावनांचे थरावर थर…!

 

कल्पनाशक्तीच्या कुंचल्याने

रंगवताना अंतरंगाच्या

कोऱ्या कॅनव्हासवर….

कधी त्याचे विचार

सकारात्मक साचार

तर कधी नैराश्य छटा

नकारात्मक घेत आकार….

 

जाणीव नेणीवांच्या पल्याड

शिरत, सुविचारांना देत थारा

स्वतःचे रंगवताना मन

चित्रकाराने ठेवावे भान

सजग सकारात्मक दृष्टिकोन…..!!

 

मायबोलीतूनी….

सजलेला धजलेल्या

मनाच्या कॅनव्हासवर

करु सदा…

आनंदी विचारातले

चित्र रेखाटन…..!

तोची विचारांचा

सुंदर आविष्कार

नि प्रगल्भ मनाचा

स्फूर्त कॅनव्हास साकार…!!

 

*मानसी जामसंडेकर, गोवा*

प्रतिक्रिया व्यक्त करा