You are currently viewing खुलं आकाश…

खुलं आकाश…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या आदर्श शिक्षिका, सावित्रीची लेक, नेशन बिल्डर्स अवॉर्ड प्राप्त लेखिका कवयित्री सुजाता पुरी यांची अप्रतिम काव्यरचना*

*खुलं आकाश…*

परवशता येऊ नये
कधीच कुणाच्या जीवनी
सैरभैर होते मन
एकाकी जसे रानी…

महाल नसे कामाचा
जिथे नाही खुलेपणा…
झोपडी मग प्यारी
जिथे असतो आपलेपणा.

अमृताचा चषक हाती
प्यायची नाही संमती..
अवीट गोडी त्याची
असुदे कितीही किंमती..

सोनेरी जरी मुलामा
पिंजरा सुख देत नाही.
खुल्या आकाशाची सर
त्याला कधीच येत नाही..

वितभर असले तरी
असावे आपले आकाश..
सूर्य नसला आपला तरी,
थोडासाच आपला असे प्रकाश..

वटवृक्षाच्या छायेखाली आपण
किती काळ बसावे..
छोटेसे च का होईना
आपलेही अस्तित्व असावे…

सुजाता नवनाथ पुरी
अहमदनगर
8421426337..

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 2 =