You are currently viewing सावंतवाडी येथील रोजगार मेळावा रद्द

सावंतवाडी येथील रोजगार मेळावा रद्द

सावंतवाडी येथील रोजगार मेळावा रद्द

सिंधुदुर्गनगरी

 जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग तथा जयानंद मठकर शासकीयऔद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. २२ मे २०२६ रोजी आयटीआय सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेला Manufacturing Sector रोजगार मेळावा महाराष्ट्र विधान परिषदेचा निवडणुक कार्यक्रम जाहीर होऊन आदर्श आचारसंहिता लागु झाल्याने (Model Code of Conduct) रद्द करण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी दिली.

या रोजगार मेळाव्यामध्ये Crompton, MRF, Kalamba Agro, Om Ganesh Electricals तसेच Quality Technical Solutions, Verna-Goa आदी नामांकित कंपन्यांचा सहभाग अपेक्षित होता. तसेच 10 वी, 12 वी व ITI पात्र उमेदवारांसाठी विविध पदांच्या रोजगार संधी उपलब्ध होणार होत्या. मात्र, सध्या लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने सदर रोजगार मेळावा रद्द करण्यात येत असून मेळाव्याची नवीन तारीख व पुढील माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल.

उमेदवारांनी कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी याची नोंद घ्यावी तसेच पुढील सूचनांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग दुरध्वनी क्र.02362-228835 किंवा कार्यालयाच्या अधिकृत समाज माध्यमांशी संपर्कात राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा