You are currently viewing कासार्डे ग्रामपंचायत शिवसेनेच्याच अधिपत्याखाली राहणार: संदेश पारकर

कासार्डे ग्रामपंचायत शिवसेनेच्याच अधिपत्याखाली राहणार: संदेश पारकर

कणकवली

कणकवली तालुक्यातील कासार्डे ग्रामपंचायत निवडणूकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून 13 जागेवर उमेदवार दिले जाणार आहेत . तसेच सरपंचही शिवसेनेचाच होणार असल्याचा विश्वास शिवसेना युवा नेते संदेश पारकर यांनी व्यक्त केला.


ग्रामपंचायत निवडणुकीबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नियोजन करण्यात येत आहे . कासार्डे पंचक्रोशीतील कासार्डे ग्रामपंचायत ही सेनेसाठी महत्वाची आहे .त्यामुळे शिवसेनेने कासार्डे ग्रामपंचायत निवडणूक लक्ष केंद्रित केले आहे .प्रत्येक उमेदवारांची चाचपणी जोरदार सुरू केलीय.कासार्डे मधील सेनेचे विभागप्रमुख बाबू पेडणेकर आणि उमेदवार ग्रामस्थ तसेच शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर तसेच तालुकाप्रमूख शैलेश भोगले यांनी विभाग प्रमुख आणि उमेदवारांशी रणनिती बाबत चर्चा केली.त्याचप्रमाणे उमेदवारांना सुद्धा ऊर्जा देत बिनदास्त निवडणूक लढवावी असे देखील संदेश पारकर यांनी सांगतले.यावेळी युवा नेते संदेश पारकर यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आलाय.
यावेळी सचिन शेट्ये, सत्यवान चोरगे, माजी नगरसेवक बापू खांडेकर, रोहन गायकवाड, अमित पाटील, मयूर पेडणेकर, साई पेडणेकर, विजय भोगले, गणेश नकाशे, दीपक मस्के, शिवदास कदम आदी ग्रामस्थ व उमेदवार उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + six =