You are currently viewing शिकार झाली हरणी

शिकार झाली हरणी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*शिकार झाली हरणी* 

 

दरवळली रात्र कस्तुरीच्या सुगंधानं

शिकार झाली हरणी मदनाच्या बाणांनं ||धृ||

 

चांदण्या रातीला हरणी भरकटली

कस्तुरीच्या मोहापायी जाळ्यात अडकली

सावज हेरलं एकटं चतूर पारध्यानं

शिकार झाली हरणी मदनाच्या बाणांनं ||१||

 

मोहमायेची बाधा झाली मृगनयनीला

श्वापदांच्या भितीनं जीव घाबरा झाला

ऐन जवानीत सैरभैर झालं खुळं मनं

शिकार झाली हरणी मदनाच्या बाणांनं ||२||

 

प्रेमाच्या तळ्यात आकंठ बुडाला जीव

फास आवळला ना कळला नियतीचा डाव

वेळ साधून नेम धरला शिकाऱ्यानं

शिकार झाली हरणी मदनाच्या बाणांनं ||३||

 

कवी :-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर,धुळे.*

७५८८३१८५४३.

८२०८६६७४७७.

प्रतिक्रिया व्यक्त करा