You are currently viewing संसार वेलीचे फूल

संसार वेलीचे फूल

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी, पत्रकार, संपादक बाबू फिलिप्स डिसोजा कुमठेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*संसार वेलीचे फूल* 

 

इरा असे माझी नात

ती सौभाग्याची सौगात

 

आई बाबा आजी आबा

काका काकू आणि दादा

 

मामा मामी सान छोटू

म्हणे वारंवार भेटू

 

खेळे नाचे गाई गाणे

आवडे चित्र काढणे

 

शाळेला बसने जाणे

मैत्रिणींशी ते खेळणे

 

रोजच्या रोज अभ्यास

पहिली येण्याचा ध्यास

 

समुद्र किनारी जावे

मनसोक्त ते पोहावे

 

रोज फुलझाडां पाणी

सायं परवचा म्हणी

 

मदत घरकामात

आजी सांगेल त्यात

 

आहे लाडकी सर्वांची

बरसात हो सुखाची

 

बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर

पुनावळे पुणे ३३

प्रतिक्रिया व्यक्त करा