You are currently viewing 14 एप्रिल रोजी नेरुर इंगेट्रॉऊट (इंगेश) हॉस्पिटलमध्ये एक दिवसीय मोफत आरोग्य शिबिर

14 एप्रिल रोजी नेरुर इंगेट्रॉऊट (इंगेश) हॉस्पिटलमध्ये एक दिवसीय मोफत आरोग्य शिबिर

*बॅ.नाथ पै फिजिओथेरपी आणि नर्सिंग महाविद्यालयातर्फे आयोजन*

 

कुडाळ :

जागतिक आरोग्य दिन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून कुडाळ तालुका पत्रकार संघ, बॅ .नाथ पै शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ नर्सिंग आणि कॉलेज ऑफ फिजीओथेरपी, प्राथमिक आरोग्य केंद्र वालावल यांच्या वतीने 14 एप्रिल रोजी नेरुर येथील लेट मिसेस इंगेट्राऊट नाईक विद्या प्रतिष्ठान मुंबई यांच्या (इंगेश) हॉस्पिटलमध्ये एक दिवसीय मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर शिबिरामध्ये रक्तदाब तपासणी, इसीजी काढणे, अस्थिव्यंग व हाडांची तपासणी, रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणी, कर्करोग तपासणी यांच्या सहित अस्थिरोग स्नायू संबंधित विकार व वेदना संधिवात, सांधेदुखी, टेनिस एलबो, हाता पायाला मुंग्या येणे, मणक्यामध्ये गॅप- फ्रॅक्चर व अपघातानंतरचे दुखणे, शिरा व स्नायू आखडणे, कंबर- पाठ व मानेचे दुखणे, स्पॉंडिलायसिस व सायटिका या रोगाबरोबरच मेंदूचा विकार, मेंदूच्या शस्त्रक्रियेपूर्वी किंवा नंतर चेहऱ्याचा पॅरालिसिस, अर्धांग वायू, लकवा, जन्मता किंवा अपघातामुळे आलेले अपंगत्व, क्रीडा इजा प्रतिबंध, आणि पुनर्वसन तसेच हृदय आणि फुफ्फुसाचे विकार इत्यादीवर सुद्धा निदान व उपचार केले जाणार आहेत.

कुडाळ तालुका पत्रकार संघ, बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, लेट मिसेस इंगेट्राऊट नाईक विद्या प्रतिष्ठान मुंबई व बॅ. नाथ फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट व प्राथमिक आरोग्य केंद्र वालावल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या गेलेल्या या आरोग्य शिबिरामध्ये सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सिंधुदुर्गातील नामांकित डॉ. संजय निगुडकर, डॉ संजीव आकेरकर, डॉ योगेश नवांगुळ, डॉ. संदेश कांबळे (अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी) डॉ. आदेश पालयेकर, डॉ. गायत्री पालयेकर, डॉ प्रगती शेटकर, डॉ .रोहन भांगरे, डॉ पी. ज्योतीरंजन , डॉ बी.प्रत्युषरंजन , डॉ .शरावती शेट्टी, असे विविध क्षेत्रातले तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन व उपचार करणार आहेत तसेच डॉ.सूरज शुक्ला जर्मनी वरून या शिबिरामध्ये रुग्ण संपर्क व टेलीमेडीसीन साठी थेट संपर्कात राहणार आहेत. अधिक माहितीसाठी प्रा. वैशाली ओटवणेकर- 9881886606, शरावती शेट्टी-7208171190, डॉ रोहन भांगरे-7208302477 नंबर वर संपर्क साधावा.

तरी इच्छुक रुग्णांनी नेरूर येथील यशवंतराव नाईक रुग्णालय व संशोधन केंद्र नेरूर अर्थात *जुने इंगेश हॉस्पिटल* येथे नियोजित वेळेत उपस्थित राहून या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा