You are currently viewing फुले,शाहू, आंबेडकर पुरस्काराने शाहीर मनोहर पवार सन्मानित

फुले,शाहू, आंबेडकर पुरस्काराने शाहीर मनोहर पवार सन्मानित

संभाजीनगर / (बबनराव आराख) :

संभाजीनगर येथील साहित्य धारा राज्य स्तरीय पुरस्काराचे व बुद्ध जयती उत्सवाचे आयोजन छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सदर विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले .यावेळी अनेक साहित्यिक मान्यवर उपस्थित होते. त्यात शाहीर, कवी, मनोहर पवार यांना सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

साहित्यधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था छत्रपती संभाजी नगर, भावना सोसायटी व विश्व सत्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धम्म आणि संविधान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2026 चे कार्य आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाचे मुख्य आयोजक मा . डॉ. संघर्ष सावळे यांनी समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक मिळवून समाजसेवक करीत असलेल्या व्यक्तींचा त्यांच्या कार्यास अनुसरून सत्कर्म करीत असलेल्या माणुसकीच्या मार्गावर चालणाऱ्या कृतीशील व्यक्तींचा गौरव व्हावा या हेतूने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. तसेच मान्यवर कवींचे कवी संमेलनही आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. मा. मेघना शिंदे नितनवरे अल्पसंख्याक विभाग मुंबई मंत्रालय, चेतना कुबडे मिस .नागपूर, ज्येष्ठ साहित्यिक कवी चंद्रकांत दादा वानखेडे पुणे, मधुकर दिवेकर पुणे, डिके मांडलिक नेवासा, ज्येष्ठ गायिका ज्योती बनकर, नागपूर , भन्ते. चंद्र बोधी, आयोजक ज्योती खंडारे, आदी मान्यवर प्रमुखाच्या उपस्थित व हस्ते फुलेशाहू आंबेडकर या पुरस्कारने केळवद गावचे शाहीर मनोहर पवार यांना गौरविन्यात आले. पवार यांना विविध क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यावेळी साहित्य तेज या दैनिकाचे संपादक – सुप्रिया जाधव, कवी संजय हिवाळे जेष्ठ कवी डॉ. अशोक शिरसाट, डॉ. निवृत्ती जाधव डी .व्ही . खरात,सर्जेराव चव्हाण जेष्ठ कवी आदी साहित्यिक हजर होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा