You are currently viewing माय…

माय…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. सरिता परसोडकर लिखित अप्रतिम अभंग*

 

*माय…*

 

सहज सुचलं !म्हणून लिहिलं!

फुल मी वाहील !तिच्या पायी!!१!!

 

आहे तिच्या ठाई! सदा चारीधाम!

मुखामध्ये राम !रोज जपे!!२!!

 

सदा तिच्यासंगे! चुलीतला जाळ!

जोडली ती नाळ !त्याच्या संगे!!३!!

 

सांगुनिया गेले! सारे साधुसंत!

आई ती महंत !एकमेव!!४!!

 

काय सांगू तुम्हा !आभाळी निळाई!

पेनातील शाई !आई माझी!!५!!

 

जरीही सोसले !कित्येक प्रघात!

दुःखावर मात !सदा करी!!६!!

 

धूप आणि दीप !सुहास चंदन!

सरळ वंदन !तिच्यापुढे..!!७!!

 

सौ परसोडकर✍🏻

प्रतिक्रिया व्यक्त करा