You are currently viewing स्मृति भाग ६९

स्मृति भाग ६९

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग ६९*  

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय, सादर, साष्टांग प्रणिपात.

आपण गौतम स्मृतिमधील अध्याय दोन पहात आहोत. त्यात द्यूत खेळणे, मूल्य दिल्याशिवाय वस्तू घेणे, हिंसा, आचार्या व त्यांची मुले, पत्नी आणि तिथे दीक्षा ग्रहण करणार्‍यांस नावाने हाक मारणे, रुक्ष शब्दोच्चार व सुरापान या गोष्टी ब्रह्मचार्‍यांनी सोडून द्याव्यात, असे स्पष्ट विधान आहे. या गोष्टी आज ब्रेड ओरिएन्टेड लर्निंग घेणार्‍या विद्यार्थ्यांकडून अपेक्षा करुन ही शक्य होत नाहीत !!

गुरुंचे उष्टे खाणे , त्यांना स्नान घालणे , त्यांचा श्रृंगार करणे , त्यांचे पाय धुणे , पाय दाबणे , वा स्पर्श करणे , असे विधान नाही !! आज या गोष्टी सर्रास होतात !!!!

*शिष्यशिष्टिरवधेनाशक्तोरज्जुवेणुविदलाभ्यां तनुभ्यामन्येनघ्नन् राज्ञा शास्यः ।।*

शिष्याचे शिक्षण दण्डाशिवाय म्हणजे शिक्षेशिवाय झाले पाहिजे . गुरु असे करण्यास असमर्थ असेल तर त्याने पातळ दोरी वा बांबुचे पातळ काठीने शिष्यास दण्डित करण्यास हरकत नाही . पण अन्य वस्तूने जर गुरुने शिष्यास दण्डित केले वा मारले तर तो राजाद्वारे दण्डित होण्यास पात्र होतो .

या ओळींचा सरळ अर्थ आहे की गुरु बौद्धिकदृष्ट्या सशक्त असावयास हवा . ज्याकडे पाहताच आदरयुक्त धाक निर्माण व्हावा असा असावा !! शिष्यास दण्डित करण्याची वेळच त्याने येवू देवू नये , असा असावा !! थोडक्यात शक्तिबुद्धियुक्त जप , तप , व्रत , नियम , अष्टांगयोगी असा असावा !! त्याने शिकवणे व आदर्श जगणे याशिवाय दुसरे उद्योग करु नयेत !! पण कलियुगातील चित्र विचित्रच आहे !! न बोललेलेच बरे !!

जोवर सर्व वेदाध्ययन पूर्ण होत नाही , तोवर ब्रह्मचर्य असावं !! विद्या समाप्तिनंतर गुरुंना धन देवून सन्मानित करावे . तत्पश्चात् स्नानानंतर तो स्नातक होतो . आचार्य गुरुजनांमध्ये श्रेष्ठ आहेत . काहींचे मताने माता ही गुरुजनांमधे श्रेष्ठ असते .

खूपच गोष्टी सांगून ठेवल्या आहेत आचार्यांनी !! स्मृतिंमध्ये अगदी बारीकसारीक गोष्टी नमूद करुन ठेवल्या आहेत .

तिसर्‍या अध्यायात ही ब्रह्मचारींबद्दल उर्वरीत वर्णन येते . तत्पश्चात चवथे विवाह प्रकरण येते . ते उद्या पाहू . आज थांबतो .

सुंदर आहेत ना स्मृति ? तशा सर्वच स्मृति वाचनीयच आहेत , चिंतनीय आहेत , मननीय आहेत आणि प्रवचनीय ही आहेत . वाचाल ना स्मृति ?

इत्यलम् ।

 

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

प्रतिक्रिया व्यक्त करा