You are currently viewing श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे ८ एप्रिलला “इथे ओशाळला मृत्यू” नाटकाचा ५१ वा प्रयोग

श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे ८ एप्रिलला “इथे ओशाळला मृत्यू” नाटकाचा ५१ वा प्रयोग

संभाजीमहाराजांच्या समाधी स्थळावर नाटयपुष्प अर्पण करण्याची संधी महाराष्ट्रात पहिल्यांदाच सिंधुदुर्गच्या कलाकारांना..

पुणे :

सिंधुदुर्गातील अल्पावधीत नावारूपाला आलेली शिवगणेश प्रोडक्शन सिंधुदुर्ग (मुंबई) या संस्थेचा “इथे ओशाळला मृत्यू” या नाटकाचा प्रयोग मृत्युंजय अमावस्या निमित्त दिनांक ८ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी बलिदान दिलेल्या पुण्यभूमीत वढू येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळावर आयोजीत करण्यात आला असून, सिंधुदुर्ग मधील कलाकारांसाठी हि अभिमानाची बाब आहे. नुकतेच या नाट्याने ५० प्रयोग पूर्ण केले आहेत आणि ५१ वा प्रयोग श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे महाराजांच्या बलिदान भूमीत पार पडणार आहे.

महाराष्ट्रात अनेक संस्था या नाटकाद्वारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वदूर पसरविण्याचे कार्य करत असतात. परंतु, नाटकासोबतच शिवसंस्कार या उपक्रमाअंतर्गत या संस्थेकडून अनेक शिवविचार जागविणारे उपक्रम राबविले जात असतात. तसेच या संस्थेने अनेक ठिकाणी प्रयोग सादर करत रसिक प्रेक्षकांवर एक वेगळी छाप सोडली आहे. त्यामुळेच या संस्थेला खुद्द धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा समाधी स्थळावर हे नाटयपुष्प अर्पण करण्याची संधी श्री धर्मवीर संभाजी राजे युवा मंच, श्री धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती आणि वढू बुद्रुक येथील समस्थ ग्रामस्थ यांनी उपलब्ध करून दिली असून, या सर्वांतर्फे इथे ओशाळला मृत्यू या नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.

या नाटकात दिगदर्शक आणि मुख्य छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत श्री गणेश ठाकूर, महाराणी येसूबाई – डॉ. सोनल लेले, औरंगजेब – श्री कृष्णा देसाई, गणोजी शिर्के व कवी कलश दुहेरी भूमिकेत प्रा.मिलिंद कासार, मौलवी – पत्रकार संदेश देसाई, असदखान – अजिंक्य देसाई, प्रल्हादपंत व मल्होजीबाबा दुहेरी भूमिकेत मंदार जंगम, धनाजी – पत्रकार विनय वाडकर, संताजी – समीर ताठे, मुकर्रबखान – दीपक झोरे यांनी भूमिका साकारल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा