You are currently viewing कुपेरीच्या घाटीला चिरे वाहतूक ट्रक पलटी होऊन चालक जखमी

कुपेरीच्या घाटीला चिरे वाहतूक ट्रक पलटी होऊन चालक जखमी

मालवण

मालवण कसाल मार्गावरील कुणकावळे येथील कुपेरीची घाटीच्या उतारावर मंगळवारी रात्री चिरे वाहतूक करणारा १२ टायरचा मोठा ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात ट्रक चालक मेगप्पा चव्हाण (रा. कर्नाटक) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मालवण येथून कर्नाटक येथे चिरे घेऊन हा ट्रक (AP-21TW 9652) निघाला होता. ब्रेक निकामी झाल्याने कुपेरीची घाटी उतारावर चालकाने ट्रक थांबवण्याचे प्रयत्न केले, मात्र एक हजार चिरे भरलेला ट्रक चालकाला थांबला नाही. कुणकावळे ग्रामपंचायत कार्यालय जवळ रस्त्याच्या बाजुला आब्यांच्या झाडाला धडक देत ट्रक पलटी झाला.

या अपघातात चालक मेगप्पा चव्हाण (रा. कर्नाटक) हा गंभीर जखमी झाला. तर क्लिनरला किरकोळ दुखापत झाली. स्थानिकांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात नेले. दोघांवरही जिल्हा रुग्णालयात अधिक उपचार सुरू आहेत. अपघातात ट्रक चे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची कोणतीही तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली नसल्याचे कट्टा दुरक्षेत्राचे पोलीस हवालदार रुक्मांगद मुंडे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा