*दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न*
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था कसाल व महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग व माजगाव ग्रामपंचायतीच्या वतीने मंगळवार दिनांक 05 मे 2026 रोजी माजगाव पंचक्रोशीतील सर्व दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा सकाळी 10.00 वाजता संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये माजगाव ग्रामपंचायत सरपंच रिचर्ड डिमेलो, माझगाव ग्रामपंचायत अधिकारी आनंदराव परब,ग्रामपंचायत सदस्य संजय कानसे ग्रामपंचायत सदस्या मधु कुंभार, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी तसेच संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सर, संस्था कर्मचारी विशाखा कासले,प्रसन्ना शिर्के ललित गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या वतीने हेलन कीलर यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून स्वागत सभारंभ करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर कासले मॅडम यांनी साईकृपा संस्थेचे अहवाल वाचन केले.संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सरांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. तसेच ग्रामपंचायत सदस्य संजय कानसे यांनी दिव्यांग बांधवांना बांधवांना अमूल्य मार्गदर्शन केले. साईकृपा संस्थेच्या वतीने सर्व दिव्यांग बांधवांना अल्पोपहार देण्यात आला.या मेळाव्याला ४०हून जास्त दीव्यांग उपस्थित होते. सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसालच्या वतीने सर्व दिव्यांग बांधवांना भेटवस्तू देण्यात आल्या.संस्था कर्मचारी शिर्के मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.
