You are currently viewing मार्क्सवादाची ‘सांस्कृतिक क्रांती’ ही केवळ भ्रांती – प्रा. डॉ. प्रसन्न देशपांडे

मार्क्सवादाची ‘सांस्कृतिक क्रांती’ ही केवळ भ्रांती – प्रा. डॉ. प्रसन्न देशपांडे

*मार्क्सवादाची ‘सांस्कृतिक क्रांती’ ही केवळ भ्रांती – प्रा. डॉ. प्रसन्न देशपांडे*

*छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला २०२६ ची निगडीत सांगता*

पिंपरी,

‘जगातील सांस्कृतिक पडझडीचा विचार करता मार्क्सवादाने सांस्कृतिक क्रांती घडवली, ही केवळ भ्रांती असून भारतात मार्क्सवाद कधीच रुजला नाही!’ असे ठाम प्रतिपादन प्रा. डॉ. प्रसन्न देशपांडे यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला २०२६ च्या अंतिम सत्रात ते बोलत होते. याच कार्यक्रमाने तीन दिवसीय व्याख्यानमालेची सांगता झाली.
‘सांस्कृतिक क्रांती की भ्रांती?’ या विषयावर अंतिम पुष्प गुंफताना प्रा. देशपांडे यांनी मार्क्सवादाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भांचा ऊहापोह केला. ‘कार्ल मार्क्सने मांडलेला क्रांतीचा सिद्धांत हा केवळ आर्थिक मूल्यांवर आधारित असून त्याचा संस्कृतीशी थेट संबंध नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले. युरोपातील एकेश्वरवादी परंपरा, धार्मिक संघर्ष आणि झेनोफोबिया या मानसिकतेतूनच सांस्कृतिक संघर्ष निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
‘भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य वैविध्य असून त्यामुळे येथे मार्क्सवादासारख्या एकरेषीय विचारसरणीला स्थान मिळाले नाही,’ असेही त्यांनी नमूद केले. तसेच, ‘परदेशी प्रभावातून मार्क्सवादी विचारसरणीने विविध घटकांना जोडण्याचे प्रयत्न केले असले, तरी समाजाने सजग राहून ते निष्प्रभ केले पाहिजेत!’ असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास उद्योजक किरण गारवे, मंडळाचे कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे, सचिव ॲड. हर्षदा पोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सतीश सगदेव व चंद्रशेखर जोशी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. समृद्धी पैठणकर यांनी सूत्रसंचालन केले, तर श्रीराम काळे यांनी आभार मानले. कायरा श्रीराम पोरे यांच्या नेतृत्वात ‘वंदे मातरम्’च्या सामुदायिक गायनाने छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला २०२६ ची उत्साहात सांगता करण्यात आली.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

_________________________
संवाद मीडिया* 

*प्रवेश सुरू… प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….*

*🎓 संजीवनी प्रशिक्षण संस्था, चिपळूण 🎓*

*(संजीवनी डी.एम.एल.टी. व नर्सिंग कॉलेज)*

*📢 Admission Open 2026–27*

*👉 महाराष्ट्र शासन नर्सिंग कौन्सिल मान्यताप्राप्त (Code: 1203)*

*👉 इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी, दिल्ली मान्यताप्राप्त*

*🌟 नर्सिंग क्षेत्रात उज्ज्वल करिअरची सुवर्णसंधी!*

*✨ G.N.M. Nursing Course*

*📚 कालावधी: 3 वर्ष*

*✅ 12वी (कोणत्याही शाखेनंतर) प्रवेश उपलब्ध*
*✅ 100%* नोकरीची संधी*

*🏥 उपलब्ध कोर्सेस*

*🔹 GNM Nursing – 3 वर्ष*
*🔹 D.M.L.T. (पॅथॉलॉजी) – 1 वर्ष*
*🔹 AST. N.M. (नर्सिंग) – 2 वर्ष*
*🔹 D.O.T.T. (ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी) – 2 वर्ष*
*🔹 M.P.H.W. (मल्टिपर्पज हेल्थ वर्कर) – 2 वर्ष*
*🔹 रुग्ण सहाय्यक (Patient Assistant) – 1 वर्ष*

*🎯 विशेष वैशिष्ट्ये*

*✔️ 100%* नोकरीची संधी*
*✔️ अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक*
*✔️ अत्याधुनिक प्रॅक्टिकल ट्रेनिंग*
*✔️ हॉस्पिटलशी संलग्न प्रशिक्षण*

*📚 पात्रता*

*👉 8 वी / 10 वी / 12 वी पास किंवा नापास विद्यार्थीही प्रवेशासाठी पात्र*

*📍 कॅम्पस व पत्ता*

*🏫 वांगडे शॉपिंग सेंटर, दुसरा मजला,
बहाद्दूर शेख नाका, चिपळूण*

*🏫 मंदार कॅम्पस, पेढांबे,
ता. चिपळूण, जि. रत्नागिरी*

🌐 www.sanjeevaniprashikshansanstha.com⁠�

*📞 संपर्क*

📱 7588476381
📱 7218850220
📱 7218850223 / 7276850220

*👉 मर्यादित जागा – आजच प्रवेश निश्चित करा!*

*👉 नर्सिंग क्षेत्रात यशस्वी करिअरची सुरुवात संजीवनीसोबत करा!*

#GNMNursing #NursingAdmission #CareerInNursing #AdmissionOpen2026
#संजीवनी नर्सिंग कॉलेज

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/202701/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा