सावंतवाडी :
माजगावच्या नवनिर्वाचित सरपंच सौ. रंजना रविंद्र कानसे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान परब यांनी सरपंच कानसे यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ग्रामविकासाच्या दृष्टीने नियोजनबद्ध काम करत माजगावच्या प्रगतीस गती द्यावी, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी रवींद्र कानसे, सौ. संजना परब उपस्थित होते
