इचलकरंजी / प्रतिनिधी :
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या व्दिशतकीय जन्मशताब्दी निमित्त महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
हा सोहळा मंगळवार दि.२८ एप्रिल रोजी कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे दुपारी तीन वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
या सोहळ्यास जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती सौ.श्रध्दा गायकवाड, उद्योगपती अण्णासाहेब चकोते, ॲड.चंद्रकांत माळी, महात्मा फुले समता परिषदेच्या प्रदेश सचिव डॉ.स्नेहा सोनकाटे, प्रदेश प्रवक्ते संतोष विरकर, कोल्हापूर समाजकल्याणचे सहायक आयुक्त सचिन साळे यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तरी या सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश चिटणीस सुनील मेटे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बागडी यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
