You are currently viewing शिरोडा सेंट्रल प्रायमरी स्कूल येथे शाळा प्रवेशोत्सव व शाळा पूर्वतयारी अभियान संपन्न

शिरोडा सेंट्रल प्रायमरी स्कूल येथे शाळा प्रवेशोत्सव व शाळा पूर्वतयारी अभियान संपन्न

शिरोडा

सेंट्रल प्रायमरी स्कूल शिरोडा नं १ येथे शाळा प्रवेशोत्सव व शाळा पूर्वतयारी अभियान मेळावा संपन्न झाला.
यावेळी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर,उपसरपंच राहुल गावडे,रेडी जि.प. माजी सदस्य प्रितेश राऊळ,गट साधन केद्र वेंगुर्ला विषय तज्ञ टिळवे सर,शा. व्य.समिती उपाध्यक्ष कांता तारी व इतर सदस्य उपस्थितीत होते.
शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांजकडून मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.
सेंट्रल प्रायमरी स्कूल शिरोडा नं 1 येथे शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळेत इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या सक्ती पात्र बालकांचे शाळापूर्व तयारी अभियान मेळावा टप्पा 2 व शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न झाला.
या मेळाव्या प्रसंगी सर्व प्रथम सक्तीपात्र बालकांसह प्रभात फेरी काढून लेझिम,ढोल ताशा सह बालकांना शाळेत आणून त्यांचे स्वागत करण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले.तसेच सात स्टॉलची मांडणी करून बालकांच्या विविध कृती घेवून मार्गदर्शन करण्यात आले.
या मेळाव्याच्या निमित्ताने शिरोडा सरपंच मनोज उगवेकर ,माजी जि.प.सदस्य प्रितेश राऊळ,शा. व्य.समिती शिरोडा नं 1 माजी अध्यक्ष,व विदयमान सदस्य लक्ष्मीकांत कर्पे आणि टिळवे सर गट साधन केंद्र वेंगुर्ला यांनी विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले.
या मेळाव्यासाठी व प्रवेशोत्सव कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत उपसरपंच राहुल गावडे,शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष कांता तारी,सदस्य नामदेव गावडे,श्रीमती अस्मिता सावंत,श्रीमती शर्वरी कांबळी,श्री फ्रान्सिस फर्नांडिस,श्रीमती संतान फर्नांडिस, अंगणवाडी सेविका ,मदतनीस,पालकवर्ग, मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते.
यावेळी शाळेमध्ये 17 विद्यार्थी यांनी पहिली वर्गात प्रवेश घेतला
या मेळाव्याचे व प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमदास राठोड यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − seven =