You are currently viewing पर्यावरणपूरक उपक्रमाचा शुभारंभ

पर्यावरणपूरक उपक्रमाचा शुभारंभ

*पर्यावरणपूरक उपक्रमाचा शुभारंभ*

*_कुंभारमाठ ग्रामपंचायतचा अभिनव प्रयत्न_* 🌱

मालवण

कुंभारमाठ ग्रामपंचायतीच्या वतीने गावामध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करून पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
कुंभारमाठ ग्रामपंचायतच्या कार्यकारीणीने अभ्यास दौऱ्यावेळी ग्रामपंचायत कार्यालय भोसे ता.मिरज जि.सांगली येथे भेट दिली असता कापडी पिशवी मशीनचा एक नाविन्यपुर्ण उपक्रम निदर्शनास आला .
त्या अनुषंगाने कापडी पिशवी केंद्र (मशीन) हे कुंभारमाठ येथील रेशनिंग दुकानाजवळ बसविण्यात आले असून, नागरिकांना सहज आणि कमी खर्चात कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या मशीनचा शुभारंभ आज मंगळवार दिनांक २१ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ठिक ११:०० वाजता करण्यात आला.
त्यावेळी सरपंच सौ.पुनम वाटेगावकर, उपसरपंच श्री.जीवन भोगावकर, पंचायत समिती सदस्य सौ.मानसी भोगावकर,पंचायत समिती आरोग्य विस्तार अधिकारी श्री.सुरज बांगर साहेब,ग्रामपंचायत अधिकारी श्री.प्रमोद निकम, ग्रामपंचायत सदस्य श्री.प्रमोद भोगावकर व सौ.अनिता गावकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
♻️ या उपक्रमामुळे –
• ग्रामस्थांना मात्र १०/- रुपयात कापडी पिशवी उपलब्ध होणार आहे.
• प्लास्टिकचा वापर कमी होईल.
• पर्यावरण स्वच्छ आणि सुरक्षित राहील.
• भविष्यातील पिढीसाठी चांगले वातावरण निर्माण होईल.
तरी सर्व ग्रामस्थांना नम्र विनंती आहे की,
प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर करावा आणि या उपक्रमाला सहकार्य करावे.
*या उपक्रमाला चांगल्याप्रकारे प्रतिसाद लाभल्यास इतर ठिकाणी हि अशा मशीन बसविण्याचा ग्रामपंचायतचा मानस आहे.*

🌍 *“माझी वसुंधरा”*
*प्लास्टिक मुक्त गाव – आपली सामूहिक जबाबदारी”*
कुंभारमाठ ग्रामपंचायत कार्यालय.

प्रतिक्रिया व्यक्त करा