You are currently viewing सावंतवाडीत ग्रामपंचायत निवडणुकात महाविकास आघाडी “एकत्र” – महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय

सावंतवाडीत ग्रामपंचायत निवडणुकात महाविकास आघाडी “एकत्र” – महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय

सावंतवाडी

तालुक्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढू, असा निर्णय आज येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक घेण्यात आली.

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत, दिलीप नार्वेकर, राष्ट्रवादीच्या महिला कोकण अध्यक्ष अर्चना घारे, शिवसेनेचे बाळा गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात ही बैठक घेण्यात आली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

येणाऱ्या काळात ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. या निवडणुका लढण्यासाठी भाजप विरुद्ध सगळे अशी भूमिका घेण्यात आली. यावेळी जास्तीत जास्त जागा लढण्याबरोबर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने आपापले प्रयत्न करावे, अशी भूमिका यावेळी घेण्यात आली.

यावेळी तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ, पुंडलिक दळवी, महेंद्र सांगेलकर, मायकल डिसोजा, चंद्रशेखर जोशी, रवींद्र म्हापसेकर, चंद्रकांत कासार आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा