*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*चित्रकाव्य*
व्योमपटावर सुंदर नक्षी
किती ते सुंदर पक्षी
दिव्यप्रभा भवताल तो सुंदर
संसारी ते दक्षी…
अवकाश घेऊनी कवेत सारे
वृक्ष तयांचा साथी
विश्वासाने उंचावरती
घरकुल बांधून घेती..
निसर्गासवे स्वप्न पाहती
होतील लेकुरवाळे
सुखे नांदतील वृक्षावरती
खेळतील मग बाळे…
आस असे ती संसाराची
माणूस असो वा खग
उंचावरती महाल त्यांचा
भिववितील ना ढग…
पंख पसरूनी करतील रक्षण
पाऊस झेलतील अंगी
किती हो सुंदर दुनिया त्यांची
रमती ते आत्मरंगी…
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
