You are currently viewing दारू पिऊन अपघातास कारणीभूत ठरलेल्या संशयितास सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर.

दारू पिऊन अपघातास कारणीभूत ठरलेल्या संशयितास सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर.

दारू पिऊन अपघातास कारणीभूत ठरलेल्या संशयितास सत्र
न्यायालयाकडून जामीन मंजूर.

ऍड. अशपाक शेख यांनी पाहिले काम

ओरोस :

या प्रकरणात कुडाळ पोलिसांनी आरोपीस अटक करून कुडाळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेबांच्या न्यायालयात हजर केले असता, प्रथम पोलीस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. दरम्यान, सदर गुन्हयातील कलमे ही सेशन ट्रायबल असल्याने आरोपीच्या वकिलांनी जिल्हा न्यायालयास धाव घेतली होती. आरोपीच्या वतीने अॅड. अशपाक शेख यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून ओरोस येथील मा. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी पन्नास हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली.
सदर प्रकरणात फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील कंटेनर (क्रमांक MH 04 MH 9667) घेऊन गोवा येथून भिवंडी येथे जात असताना कुडाळ तालुक्यातील बिबवणे परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर आरोपीने मद्यप्राशन करून ट्रक (क्रमांक GJ 16 AY 1324) बेदरकारपणे चालवून कंटेनरला दोन वेळा जोरदार धडक दिल्याचा आरोप आहे. या धडकेत कंटेनर डिव्हायडरवर चढून रस्त्याबाहेर जाऊन पलटी झाला. या अपघातात फिर्यादी जखमी झाले असून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या प्रकरणात आरोपीस अटक करून प्रथम पोलीस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. आरोपीच्या वतीने जामीन अर्ज दाखल करण्यात आला. सदर अर्जावरील युक्तिवाद अॅड. अशपाक शेख यांनी मांडला असता न्यायालयाने तो ग्राह्य धरून आरोपीस जामिनावर मुक्तता मंजूर केली. सदर प्रकरणात आरोपीच्या वतीने अॅड. अशपाक शेख यांनी काम पाहिले असून अॅड. नामदेव मठकर, अॅड. पंकज खरवडे, अॅड. विनय रजपूत, अॅड. कैस शेख, अॅड. भुषण कदम व अॅड. निकिता हरकुळकर यांनी सहाय्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा