You are currently viewing चंद्र तुझ्या डोळ्यात

चंद्र तुझ्या डोळ्यात

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. कविता किरण वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*चंद्र तुझ्या डोळ्यात*

 

चंद्र तुझ्या डोळ्यात या

देतो मजला पूर्णत्व

समाधान तुझ्यामुळे

तूच जीवनाचे तत्व

 

विसरुन गेले मला

आणि आठवते तुला

माझ्या हृदयात फक्त

तुझ्या आठवांचा झुला

 

सुख माझे गवसले

मला तुझ्या असण्यात

चांदण्याने उजळतो

चंद्र जसा आकाशात

 

वीण माझ्या आयुष्याची

आहे तुझ्या काळजात

माझा श्वास बहरतो

तूच माझ्या अस्तित्वात

 

सौ कविता किरण वालावलकर

दावणगिरी, कर्नाटक

प्रतिक्रिया व्यक्त करा