माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार माननीय श्री नारायणराव राणे साहेब यांचावाढदिवस साजरा*
सिंधुदुर्ग
भाजप दिव्यांग विकास आघाडी सिंधुदुर्ग यांच्या वतीने श्री राणे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी दांडेली येथे जाऊन माऊली मतिमंद व कर्णबधीर विद्यालयामध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरुवात भाजप दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक श्री अनिल शिंगाडे यांनी उपस्थिताचे शब्द सुमनानी स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.हा वाढदिवस 75 वा असून कर्णबधिर व मतिमंद विद्यार्थ्यांच्या सोबत करण्यात आला. यावेळी माऊली मतिमंद व कर्णबधिर विद्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते. माऊली मतिमंद व कर्णबधीर शाळेच्या शिक्षकांनी माननीय श्री राणे साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मतिमंद व कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या समवेत केक कापण्यात आला.भाजप दिव्यांग विकास आघाडी सिंधुदुर्ग चे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे सर तसेच दिव्यांग बांधवांच्या वतीने त्याचप्रणे भाजप दिव्यांग विकास आघाडी मार्फत अधिकाऱ्यांच्या वतीने मा.राणे साहेब यांना उत्तम आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. माऊली मतिमंद व कर्णबधिर शाळेच्या शिक्षकांनी उपस्थितांचे आभार मानून आनंदी वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.व कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.
