You are currently viewing कुडाळ तहसील कार्यालयात आयोजीत बैठकीत आ. वैभव नाईक यांच्या प्रांताधिकारी व तहसीलदार यांना सूचना

कुडाळ तहसील कार्यालयात आयोजीत बैठकीत आ. वैभव नाईक यांच्या प्रांताधिकारी व तहसीलदार यांना सूचना

*विद्यार्थ्यांना शालेय दाखले व आवश्यक कागदपत्रे वेळेत द्या*

 

*क्रीडा संकुलाचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करा*

 

कुडाळ :

 

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज कुडाळ तहसील कार्यालयात भेट दिली.यावेळी प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे, तहसीलदार अमोल पाठक, तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांच्या समवेत विविध विषयांवर बैठक संपन्न झाली. कुडाळ येथील क्रीडा संकुलाच्या कामाचा आढावा त्यांनी घेतला.उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत सूचना आ. वैभव नाईक यांनी दिल्या.तसेच विद्यार्थ्यांना शालेय दाखले व आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील प्रांताधिकारी व तहसीलदार यांना दिल्या.

दरम्यान प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे यांना वाढदिवसानिमित्त आ. वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी तहसीलदार अमोल पाठक, तालुका क्रीडा अधिकारी श्री विजय शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे,अतुल बंगे, राजू गवंडे,गुरु गडकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा