You are currently viewing माजी आमदार परशुराम उर्फ (जी.जी.) उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त नाणोस येथे इतिहास साधनांचे प्रदर्शन

माजी आमदार परशुराम उर्फ (जी.जी.) उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त नाणोस येथे इतिहास साधनांचे प्रदर्शन

माजी आमदार परशुराम उर्फ (जी.जी.) उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त नाणोस येथे इतिहास साधनांचे प्रदर्शन

दुर्ग मावळा प्रतिष्ठान, दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था भारत यांच्या सहकार्याने उपक्रम

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील श्री देव वेतोबा विद्यामंदिर शाळा, नाणोस नं. ०१ येथे गुरुवार दिनांक ०९ एप्रिल २०२६ रोजी माजी आमदार परशुराम उर्फ (जी.जी.) उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
युवा सेना तालुकाप्रमुख आशिष सुभेदार राजाराम चीपकर यांच्या संकल्पनेतून तसेच दुर्ग मावळा प्रतिष्ठान, दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था भारत यांच्या सहकार्याने “इतिहासाची साधने व प्रदर्शन” हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वस्तू, शस्त्रे, प्राचीन साधने व किल्ल्यांच्या इतिहासाची माहिती देण्यात आली. इतिहासाची गोडी निर्माण करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी व स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आयोजकांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी जागरूकता वाढण्यास मदत होत असल्याचे मत व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा