You are currently viewing किती गेले पावसाळे

किती गेले पावसाळे

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*किती गेले पावसाळे*

 

 

कडा मनाच्या कोरड्या साथ शोधत राहिल्या,

किती गेले पावसाळे वाटा सरींनी भिजल्या..

 

अपुर्‍याशा काही गोष्टी ढगांआड दाटलेल्या,

काही लयबद्घ पुष्टी स्मरणात उरलेल्या..

 

श्वास घेतले मातीने ओलाव्याच्या थेंबातले,

विरहाच्या सावल्यांनी ध्यास जगण्याचे दिले..

 

मनालाही सापडतो जरी स्मरणांचा श्वास,

किती गेले पावसाळे तरी उरतोच त्रास..

 

साक्ष होते रिमझिम क्षण वाळू सरकते,

आयुष्याची रेखाचित्रे पुन्हा पाहत बसते..

 

वाटा निघून गेलेल्या जरी उदास वाटल्या,

तरी अंतरी टिकून आस अशा मधुरल्या ..

 

नभी अंधार दाटले वारे सुसाट सुटले,

किती गेले पावसाळे भावसूर उमटले..

 

थेंब विरहाचे भार पानांवरी दडलेले,

प्रेम प्रकाशी अपार तरी हृदयी जागले..

 

नाते-संग कित्येकसे कालौघात हरवले,

किती गेले पावसाळे ऋतूरंग बदलले..

 

आठवांच्या सरींनीही जुने तरंग छेडले,

तुझ्या नावाचे नादही तरी मनात घुमले..

 

उत्तरांच्या शोधातच प्रश्न तसेच उरले,

गेले दिवस व्यर्थच किती गेले पावसाळे..

 

 

प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®

प्रतिक्रिया व्यक्त करा